डॉक्टर मुलगा आणि सुनेची पोलीस चौकशी   

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण

सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूरचे प्रसिद्ध मेंदू रोग तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस चौकशीला वेग आला आहे. या चौकशीमधून नवे धागेद्वारे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी डॉक्टर वळसंगकर यांचा मुलगा डॉक्टर आश्विन आणि सून डॉक्टर शोनाली यांचे जबाब नोंदविले आहेत. याशिवाय हॉस्पिटलमधील काही कर्मचार्‍यांची जबाब घेण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू असून प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिचीसुद्धा वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी सुरू आहे. 
 
डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्या प्रकरणी हॉस्पिटलमधील कर्मचारी महिला अधिकारी मनीषा मुसळे-माने हिला अटक करण्यात आली आहे. तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सोनावण्यात आली आहे. फिर्याद दिलेले डॉक्टर आश्विन वळसंगकर यांच्या जबाबमध्ये अनेक नवीन बाबींचा खुलासा झाला आहे. काही वर्षांपूर्वी डॉक्टर वळसंगकर यांनी आपले हॉस्पिटल संपूर्णपणे मुलगा आश्विन आणि सून शोनाली यांच्या हाती सोपवले होते. 
 
प्रशासकीय जबाबदारी मनीषा मुसळे-माने या पार पाडत होत्या. परंतु हॉस्पिटलचा दैनंदिन कारभार, उपचार व्यवस्थापन आणि प्रशासकीय जबाबदारी यामुळे आश्विन आणि शोनाली यांच्यावर प्रचंड मानसिक ताण वाढल्याचे उघड झाले आहे. परिणामी जानेवारी २०२५ मध्ये डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलच्या कामकाजाची धुरा स्वतःकडे घेतली होती. त्या दरम्यान मनीषा मुसळे-माने विरोधात आर्थिक गैरवहारासंदर्भातील काही तक्रारी डॉक्टर वळसंगकर यांच्याकडे आलेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी मनीषा यांचे अधिकार कमी केले होते. याच पार्श्वभूमीवर मनीषा मुसळे-माने यांनी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्याशी वाद घातला होता. इतकेच नव्हे तर तिने ईमेलद्वारे आत्महत्या करण्याची धमकी सुद्धा दिली होती. 
 
काही महिन्यांपूर्वी वळसंगकर कुटुंबात संपत्तीच्या शेअर्स विषयी चर्चा झाली होती. त्यानंतर डॉक्टर वळसंगकर यांनी काही महिने आधीच संपत्तीचे वाटप कसे करावे? याबाबत सविस्तर शपथपत्र तयार केले होते. कुटुंबात काही कारणांनी कलह देखील निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत. डॉक्टर वळसंगकर यांच्या हत्यामागील खरे कारण शोधण्यासाठी अधिकाधिक माहिती गोळा करण्यात येत आहे. हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांची सुद्धा यासाठी मदत घेण्यात येत आहे. डॉक्टर वळसंगकर आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढल्यामुळे पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles